Coronavirus : 'कोरोना भारतात येऊ दे रे देवा'; अभिनेत्याची प्रार्थना

वृत्तसंस्था
रविवार, 1 मार्च 2020

'बिग बॉस'मधून प्रसिद्धीझोतात

- नेटिझन्सकडून उलट प्रतिक्रिया

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण झाल्यामुळे आत्तापर्यंत 20 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यावर आता एका अभिनेत्याने कोरोना व्हायरसची लागण भारतीयांनाही व्हावी, यासाठी देवाकडे चक्क प्रार्थना केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे आत्तापर्यंत अनेकजण दगावले आहेत. हा व्हायरस जगाला विळखा घालत आहे, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जवळजवळ 25 देशांमध्ये या व्हायरसची लागण झाली. यातील रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, भारताला या व्हायरसचा धोका अद्याप बसला नाही. असे असताना आता अभिनेता कमाल खान यांनी ट्विट करत यावर खळबळजनक वक्तव्य केले.

coronavirus

कमाल खान यांनी ट्विट करत म्हटले, की कोरोना व्हायरस भारतात लवकर यावा, त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. कोरोना जर भारतात आला तर देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील आणि या कोरोना व्हायरसची लढा देतील. 

'बिग बॉस'मधून प्रकाशझोतात

कमाल खान उर्फ केआरके हे 'बिग बॉस'च्या माध्यमातून प्रकाशझोतात आले आहेत. सतत काहीतरी वक्तव्य करून चर्चेत राहत असतात. आता त्यांनी कोरोनाबाबत वक्तव्य केले. 

KRK

नेटिझन्सकडून उलट प्रतिक्रिया

कमाल खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर काही तासांतच अनेक नेटिझन्सकडून यावर उलट प्रतिक्रिया देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I pray GOD for the Coronavirus outbreak in India as soon as possible says Kamal Khan KRK