मला गोळी घाला; पण दलितांना मारू नका:मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

हैदराबाद - गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित झाले असून, जर कोणाला हल्ला करायचाच असेल, तर त्यांनी तो माझ्यावर करावा, कोणाला गोळी झाडायची असेल, तर त्यांनी ती माझ्यावर झाडावी; पण दलितांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असे उद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. ते हैदराबादेत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. सामाजिक ऐक्‍यालाच आपण प्राधान्य द्यायला हवे. भाषा, जात, श्रेष्ठ, कनिष्ठ या आधारावर समाजाचे विभाजन होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

सामाजिक ऐक्‍याला आम्ही प्राधान्य द्यायला हवे, देशाचे ऐक्‍य हाच आपला ठेवा आणि भविष्य आहे. जेव्हा मला अमेरिकेच्या संसदेमध्ये बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मला डॉ. आंबेडकर आठवले. माझे सरकार हे गरीब, दलित, पीडित आणि वंचितांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांना दलितांची मते आपलीच मक्तेदारी वाटत होती ती मंडळी आता भाजपच्या चांगल्या कामांची लोकांना माहिती होत असल्याचे पाहून घाबरली आहेत. वसुधैव कुटुंबकम हा भारतीय संस्कृतीला जोडणारा सांधा आहे. आपण आपल्याच भावा बहिणींवर हल्ला करत आहोत ही खरोखरच लाजीरवाणी बाब आहे. जोपर्यंत आपण दलित बंधू आणि भगिनींचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत जग आपल्याला माफ करणार नाही. आपण दलित आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण करायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले.
 
स्वातंत्र्यदिनी लोकांनी विविध ठिकाणांवर तिरंगा यात्रा काढाव्यात, तेलंगणातील लोकांनी 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान यात्रा काढाव्यात. यामध्ये खासदारांनीदेखील सहभागी व्हावे. या यात्रा दरम्यान ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना लोकांनी भेट द्यावी. 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Web Title: I put a bullet; But do not kill Dalits: Modi