शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणातच - उमा भारती

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

'शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहून जनतेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची सहकारी म्हणून आणखी खूप काम करायचे आहे', असे मत केंद्रिय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली - 'शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहून जनतेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची सहकारी म्हणून आणखी खूप काम करायचे आहे', असे मत केंद्रिय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. 

मी थकलेली नाही किंवा निवृत्त झालेली नाही, जनतेसाठी मला आणखी  खुप मोठे काम करायचे आहे. असे एका मुलाखतीदरम्यान उमा भारती म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचीही स्तुती केली. 

वयाच्या 27 व्या वर्षी मी लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते, 36 व्या वर्षी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली होती, तर मी एकवेळेस मुख्यमंत्री झालेले आहे, एकूण 6 वेळेस लोकसभेची निवडणूक आणि 2 वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे, त्याचबरोबर मी दोन राज्यांमध्ये निवडणूक जिंकलेली आहे." अशी माहीतीही उमा भारती यांनी दिली आहे.

Web Title: I shall be in politics till my last breath says uma bharti