दिल्ली : वाहतूक मंत्र्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

दिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) सरकार असून, गेहलोत यांच्याकडे वाहतूक, कायदा आणि महसूल मंत्रालयाचा पदभार आहे. नजफगढ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीचे सार्वजनिक वाहतूक मंत्री कैलाश गेहलोत यांच्या घरासह सोळा ठिकाणी आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. कर चुकविल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले.

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश गेहलोत यांच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील 16 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. प्राप्तीकर विभागाच्या 30 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. गेहलोत यांच्याशी संबंधित असलेल्या दोन कन्स्ट्रक्शन कंपनीने कर चुकविल्याचा आरोप आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) सरकार असून, गेहलोत यांच्याकडे वाहतूक, कायदा आणि महसूल मंत्रालयाचा पदभार आहे. नजफगढ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Web Title: I-T Department raids 16 premises linked to Delhi transport minister Kailash Gahlot as part of tax evasion probe