कर्नाटक: प्राप्तीकर विभागाच्या छाप्यात 162 कोटी जप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

या प्रकरणी जारकीहोली यांनी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सहकार्य केल्याचे म्हटले आहे. तर, हेब्बलकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

बेळगाव - कर्नाटक महिला काँग्रेसच्या प्रमुख लक्ष्मी आर. हेब्बलकर आणि मंत्री रमेश एल. जारकीहोली यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात 41 लाख रुपयांच्या रोकडसह 162 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे हेब्बलकर आणि जारकीहोली यांच्या निवासस्थानी व उद्योगांच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या ठिकाणी 41 लाख रुपयांची रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. या सर्व संपत्तीचे मोजमाप करण्यात आले असून, ही 162 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही संपत्ती बेहिशेबी संपत्ती असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणी जारकीहोली यांनी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सहकार्य केल्याचे म्हटले आहे. तर, हेब्बलकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: I-T finds Rs 162 cr, 12 kg gold after raids on Karnataka minister, Congress leader