माजी अर्थमंत्र्याच्या मुलाच्या घरावर छापे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

करचुकवेगिरी आणि कर्ज बुडविल्याप्रकरणी जम्मू-काश्‍मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहिम राठर यांचे पुत्र हिलाल राठर यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने आज छापे घातले. अब्दुल रहिम राठर हे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आहेत. हिलाल यांच्या श्रीनगर, नवी दिल्ली आणि लुधियाना येथील घरांची तपासणी करण्यात आली.

श्रीनगर : करचुकवेगिरी आणि कर्ज बुडविल्याप्रकरणी जम्मू-काश्‍मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहिम राठर यांचे पुत्र हिलाल राठर यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने आज छापे घातले. अब्दुल रहिम राठर हे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आहेत. हिलाल यांच्या श्रीनगर, नवी दिल्ली आणि लुधियाना येथील घरांची तपासणी करण्यात आली. 

श्रीनगर, दिल्ली आणि लुधियाना येथिल एकूण आठ मालमत्तांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केली आहे. प्राप्तिकर विभाग पुरावे आणि कागदपत्रांचा शोध घेत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिलाल राठर यांनी जम्मू-काश्मीर बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हिलाल राठर यांच्या बँकेतील व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाने आधीपासूनच नजर ठेवली होती. त्यानंतरच त्यांनी छापे मारले असल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I-T sleuths raid premises of former J&K Former Ministers son