मोदी म्हणतात, 'मी दरवर्षी पाच दिवस एकटाच जंगलात जायचो'

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्ली : अनेकांना माहिती नाही, की मी दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये एकटाच जंगलात जायचो. तिथे कोणीतीही व्यक्ती नसायची. तिथे फक्त स्वच्छ पाणी असायचे. या पाच दिवसांसाठी आवश्यक अन्न मी न्यायचो. तेथे कोणतेही वर्तमानपत्र, रे़डिओही नव्हते. तसेच त्यावेळी कोणतीही टीव्ही किंवा इंटरनेट यांपैकी काहीही उपलब्ध नव्हते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

फेसबुक पेजवरील 'द ह्युमन ऑफ बॉम्बे'मध्ये मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''मी जंगलातील परिसरात जायचो. तेथे स्वच्छ पाणी आणि कोणतीही व्यक्ती नव्हती. दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीतील मी त्या ठिकाणी जायचो. त्यामुळे आता मी नेहमी सर्वांना आग्रह करतो. विशेषत: माझ्या तरुण मित्रांना. त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून काही वेळ काढावा. त्यांनी यावर विचार करावा आणि त्यानंतर आत्मनिरीक्षण करावे. त्यामुळे तुमचा समज बदलला जाऊ शकतो. तसेच तुम्ही आत्मविश्वासूही बनू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, ''या सर्व गोष्टी येत्या काळात तुमच्यासाठी मदतीच्या ठरतील. त्यामुळे मला प्रत्येकाला सांगायचे आहे, की तुमच्यापैकी प्रत्येक जण विशेष असा आहे. तुम्ही इतरत्र कोणताही प्रकाश शोधू नका. तो तुमच्या सर्वांमध्ये आहे''. 

Web Title: I used to live in a jungle alone for 5 days every year says Prime Minister Narendra Modi