मला रामकृपाल यादव यांचे हात तोडावेसे वाटले : मीसा भारती

मला रामकृपाल यादव यांचे हात तोडावेसे वाटले : मीसा भारती

पाटणा : राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभेच्या खासदार मीसा भारती यांनी राजदचे बंडखोर नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करून वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले की, रामकृपाल यादव हे राजद सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची खबर मिळताच, मला वाटले की, त्यांचे हात तोडू.
मीसा भारती यांनी हे विधान 16 जानेवारी रोजी पाटण्यात आयोजित जाहीर सभेत केले आहे.

त्या म्हणाल्या, की ते गवत कापत होते, तेव्हा आमच्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर, सन्मान होता. मात्र, जेव्हा त्यांनी सुशील मोदी यांना साथ दिली तेव्हा हा आदर संपला. त्याक्षणी वाटले की, गवत कापणाऱ्या त्या मशिननेच त्यांचे हात तोडू. आता जिंकण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे, 2014 मध्ये तयारीला वेळ मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या.

रामकृपाल यादव हे राजदमध्ये असताना लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ते राजद सोडून भाजपत दाखल झाले. 2014 मध्ये ते पाटलीपुत्रमधून राजदच्या उमेदवार मीसा भारती यांना पराभूत करून लोकसभेत पोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com