मला पन्नास पाक सैनिकांची मुंडकी पाहिजेत : हुतात्मा जवानाची कन्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

हुतात्मा जवान प्रेम सागर यांच्या कन्येने 'मला पाकिस्तानच्या पन्नास सैनिकांचे मुंडकी पाहिजेत', असे म्हणत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

देवरिया (उत्तर प्रदेश) : शस्त्रसंधीचा भंग करून प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले. पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्‍वभूमीवर हुतात्मा जवान प्रेम सागर यांच्या कन्येने 'मला पाकिस्तानच्या पन्नास सैनिकांचे मुंडकी पाहिजेत', असे म्हणत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये सुभेदार परमजितसिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हुतात्मा झाले. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर प्रेम सागर यांची कन्या सरोज हीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ती म्हणाली, 'माझ्या वडिलांच्या बलिदानाचा बदला म्हणून मला पन्नास पाकिस्तानची सैनिकांचे मुंडकी पाहिजेत.' सागर हे उत्तर प्रदेशमधील देवरिया गावातील रहिवासी होते. तर परमजितसिंग हे पंजाबमधील तरन तारन शहरातील निवासी होते.

आज (मंगळवार) परमजितसिंग यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. परमजितसिंग यांच्या भावाने "केंद्र सरकारने कडक कारवाई करावी. युद्ध हाच एक पर्याय असेल तर आपण युद्धाला सामोरे जाऊन एकदाचा विषय संपवायला हवा', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Web Title: I want heads of 50 Pakistani soldiers : BSF martyr Prem Sagar's daughter