पत्रकार परिषदांना मी घाबरत नव्हतो - डॉ. सिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - ‘‘मी मौनी पंतप्रधान होतो, असे मला म्हटले जायचे. पण, मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो,’’ असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केले आहे. नाव न घेता त्यांनी मोदींना हा टोला लगावला. ‘‘लोक मला ‘ॲक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हणतात, त्याचबरोबर मी ‘ॲक्‍सिडेंटल फायनान्स मिनिस्टर’ही होतो,’’ असेही ते म्हणाले.

‘चेंजिंग इंडिया’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन झाले. अर्थमंत्री  आणि पंतप्रधान या दोन्ही कारकिर्दीतील घटनांवर डॉ. सिंग यांनी पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. या वेळी माजी मंत्री जयराम रमेश, मणिशंकर अय्यर आणि माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू हे उपस्थित होते. या वेळी डॉ. सिंग म्हणाले, ‘‘स्वतंत्र अस्तित्व असलेल्या आरबीआयने केंद्र सरकारच्या सहकार्याने काम केले पाहिजे. आरबीआय आणि केंद्र सरकार एकमेकांच्या सहकार्याने व सुसंवादाने काम करतील, अशी मला आशा वाटते.’’ रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा धक्कादायक होता, तसेच त्यामुळे देशाचे नुकसानच झाले आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

‘‘मी मौनी पंतप्रधान होतो, असे मला लोक म्हणत. मला वाटते माझ्या पुस्तकातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील.’’ असे डॉ. सिंग म्हणाले. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: I was not afraid of the press councils says Dr. Manmohan singh