इतक्‍यात परतणार नाही : शरीफ 

पीटीआय
सोमवार, 25 जून 2018

पत्नी व्हेंटिलेटरवर असल्याने सध्या तरी पाकिस्तानमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.

लंडन : पत्नी व्हेंटिलेटरवर असल्याने सध्या तरी पाकिस्तानमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.

शरीफ यांची पत्नी कुसलूम यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर त्या येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर आहेत. शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्याबाबत पाकिस्तानमधील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पदच्युत अध्यक्ष व माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी मात्र मायदेशात परतत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: i will not return now says shariff