पुढचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची : शरद पवार

पुढचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची : शरद पवार

मुंबई : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर नक्की होईल आणि पुढचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या 'मुंबई मंथन' या कार्यक्रमात बोलत होते. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक निकालाच्या आधारावर सर्व पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवं सरकार स्थापन होईल. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. 'देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. 2004 प्रमाणे यावेळी एका पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही. भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे समविचारी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू. समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. मी सुद्धा यातील एक भाग आहे. 

मोदी देशाचे सामर्थ्यशाली नेते नाहीत
मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वांत शक्तिशाली नेते आहेत. मात्र त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करु नका, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यात खूप मोठी तफावत असल्याचे त्यांनी यावेळी प्रामुख्याने लक्षात आणून दिले. मोदींच्या नेतृत्त्वाखाली युती सरकार स्थापन होणारच नसल्याचा दावा त्यांनी केला. 2014 मध्ये मिळवलेला एकतर्फी विजय सोडल्यास त्याआधी भाजपानेदेखील कायम आघाडीच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता याची आठवण त्यांनी करुन दिली आणि सांगितले की, पूर्ण भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही आणि मोदी कधीही सरकार स्थापन करण्यास यशस्वी होणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com