शमीच्या प्रकृतीसाठी अल्लाकडे प्रार्थना - हसीन जहाँ

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

अपघाताचे वृत्त कळल्यानंतर पत्नी हसीन जहाँ हिने, 'मी शमीबाबत काही वाईट होईल असा विचार केला नाही. तो काही माझा वैरी नाही. तो जर आजारी असेल तर, मीही अस्वस्थ होते. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी अल्लाकडे प्रार्थना करेन', अशी भावना व्यक्त करेन. 

नवी दिल्ली : अलीकडेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या मोटारीला रविवारी (ता. 25) सकाळी डेहराडूनजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. काही दिवस झाले शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

अपघाताचे वृत्त कळल्यानंतर पत्नी हसीन जहाँ हिने, 'मी शमीबाबत काही वाईट होईल असा विचार केला नाही. तो काही माझा वैरी नाही. तो जर आजारी असेल तर, मीही अस्वस्थ होते. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी अल्लाकडे प्रार्थना करेन', अशी भावना व्यक्त करेन. 

डेहराडूनवरून नवी दिल्लीकडे येत असताना शमीच्या कारला ट्रकची धडक बसून अपघात झाला. त्याच्या डोक्याला 10 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो डेहराडूनमध्येच असून, तेथे त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. घरातही तो तिच्यावर आत्याचार करायचा असा आरोप तिने केला होतो. याशिवाय, क्रिकेट सामन्यात मॅच फिक्सिंग प्रकरणीही हसीनने त्याच्यावर आरोप केले होते. त्यामुळे शमी हा मानसिकदृष्ट्या खचला होता. 'ही गोष्ट कळल्यावर मी शमीला दोन वेळा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणाने बोलणे होऊ शकले नाही. जेव्हा बातम्यांमध्ये त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे हे कळल्यानंतर मला जरा बरं वाटलं', असे हसीनने सांगितले.    

Web Title: I will pray to Allah he gets well soon': Mohammed Shami's wife Hasin Jahan shaken after his accident