मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल: ज्योतिरादित्य सिंधिया

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल असे, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

मध्य प्रदेशात 15 वर्षानंतर काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. परंतु, ज्योतिरादित्य सिंधिया व राहुल गांधी यांची मैत्री सर्वांना माहित आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री पदासाठी दबाव टाकण्यात येत आहे.

मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटल्यामुळे नवा राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: i would like to be chief minister says jyotiraditya scindia