मला करायची आहे अनुप जलोटांसोबत अंघोळ- राखी सावंत

वृत्तसंस्था
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

भजनसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटांसोबत मला आंघोळ करायची आहे असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री राखी सावंत हिने केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनं पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई-  भजनसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटांसोबत मला आंघोळ करायची आहे असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री राखी सावंत हिने केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनं पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. 

तिने व्हुट बीग बझमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी या शोचा होस्ट अपारशक्ती खुराना यानं राखीला एक प्रश्न विचारला. बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनी कोणती गोष्ट दान करावी? असा हा प्रश्न होता. यावर राखीने जस्लिनचे कथित प्रियकर अनुप जलोटांना दान करावं, मी त्यांना खरेदी करायला एका पायावर तयार आहे. मला त्यांच्यासोबत अंघोळ करायची आहे. जस्लिननं त्यांच्यासाठी मेकअप-कपडे सोडायला नकार दिला मग आता उरलंच काय? असेही राखी सावंत हिने यावेळी म्हटले.

या कार्यक्रमादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीसंत हा माझा सर्वात आवडता स्पर्धक असून अंतिम फेरीमध्ये त्याच्यासोबत मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडे, तसेच बिग बॉस सीजन 12 मधील जस्लिन आणि दीपिका पोहोचतील असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I would like to take shower with Anup Jalota ji says Rakhi Sawant