esakal | IAF : 'टू फिंगर टेस्ट'प्रकरणी हवाईदल प्रमुखांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

'टू फिंगर टेस्ट'प्रकरणी हवाईदल प्रमुखांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

'टू फिंगर टेस्ट'प्रकरणी हवाईदल प्रमुखांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : कोईमतूर येथील हवाई दलातील महिला अधिकाऱ्यावरील झालेल्या कथीत बलात्कारप्रकरणी चर्चेत असलेल्या 'टू फिंगर टेस्ट' बद्दल नवे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अशा घटनांबाबत हवाई दलातील कायदे हे खूपच कडक आहेत, असं सांगताना अशी कुठलीही चाचणी झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हवाई दल प्रमुख चौधरी म्हणाले, "अशा घटनांबाबत हवाई दलाचे कायदे खूपच कडक आहेत. दलातील महिला अधिकाऱ्यावर 'टू फिंगर टेस्ट' करण्यात आल्याचा चुकीचा आहवाल दिला गेला. अशा प्रकारची कुठलीही टेस्ट करण्यात आलेली नाही. दलातील सर्व जणांना या नियमांची माहिती आहे. तसेच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल"

हेही वाचा: IAF महिला अधिकाऱ्याला 'टू फिंगर टेस्ट' सल्ला; हवाई दल प्रमुखांना महिला आयोगाचे पत्र

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय हवाई दलाच्या एका 28 वर्षीय महिला अधिकाऱ्याच्या 'टू-फिंगर टेस्ट'वर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि हवाई दल प्रमुखांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्याची पुष्टी कारण्यासाठी 'टू फिंगर टेस्ट' करण्यात आल्याची चर्चा होती.

हेही वाचा: ‘टू फिंगर्स टेस्ट’ची माहिती अभ्यासक्रमातून वगळा, उच्च न्यायालयात याचिका

'टू फिंगर टेस्ट' करण्यास भारतात बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आठ वर्षापूर्वी निर्णय देताना पूर्णपणे बंदी घातली होती. महिला आयोगाने हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यास आणि कारवाई करण्यास सांगितलं होतं.

loading image
go to top