गुजरातच्या कच्छमध्ये वायूदलाचे विमान कोसळले ; वैमानिकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

भारतीय वायूदलाचे जाग्वार हे विमान दैनंदिन प्रशिक्षणासाठी जात असे. या विमानाचे उड्डाण जामनगर येथून दररोज होत असे. मात्र, आज (मंगळवार) जाग्वार या विमानाचे उड्डाण केले. काही काळ ते हवेत होते. मात्र, काही मिनिटांतच या विमानाला अपघात झाल्याचे समजले.

नवी दिल्ली : गुजरातच्या कच्छमध्ये भारतीय वायूदलाचे लढाऊ विमान कोसळले. या भीषण अपघातात वैमानिक एअर कमांडर संजय चौहान हुतात्मा झाले. वायूदलाच्या या विमानाने दैनंदिन प्रशिक्षणासाठी जामनगर हवाईतळावरून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच या विमानाचा अपघात झाला. 

भारतीय वायूदलाचे जाग्वार हे विमान दैनंदिन प्रशिक्षणासाठी जात असे. या विमानाचे उड्डाण जामनगर येथून दररोज होत असे. मात्र, आज (मंगळवार) जाग्वार या विमानाचे उड्डाण केले. काही काळ ते हवेत होते. मात्र, काही मिनिटांतच या विमानाला अपघात झाल्याचे समजले. जाग्वार हे विमान गुजरातच्या कच्छ भागात कोसळले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. मात्र, याशिवाय कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.  

दरम्यान, मागील काही दिवसांपासून झालेल्या विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आसामच्या माजुली द्वीपजवळ भारतीय वायूदलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यामध्ये विंग कमांडर जे. जेम्स आणि विंग कमांडर डी. वत्स यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता ही दुर्घटना घडली. 

Web Title: IAF fighter jet crashes in Gujarats Kutch pilot killed