हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

हे विमान चालविणाऱ्या प्रशिक्षणार्थी वैमानिकास किरकोळ जखमा झाल्या आहेत. या विमानाने खरगपूर येथील कलैकुंडा विमानतळावरुन उड्डाण घेतले होते

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे "हॉक ऍडव्हान्स्ड ट्रेनर जेट' विमान आज (मंगळवार) ओडिशामधील मयुरभंज जिल्ह्यामध्ये कोसळले.

हे विमान चालविणाऱ्या प्रशिक्षणार्थी वैमानिकास किरकोळ जखमा झाल्या आहेत. या विमानाने खरगपूर येथील कलैकुंडा विमानतळावरुन उड्डाण घेतले होते. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. अपघाताचे हे ठिकाण झारखंड राज्याच्या सीमारेषेजवळ आहे.

Web Title: IAF plane crashes in Mayurbhunj, Odisha