IAS ची तयारी करणारा ATM फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या, इंटरनेटवर शिकला चोरीचा फंडा  

सुशांत जाधव
Monday, 27 July 2020

या टोळीतील इतर आरोपी देखील उच्चशिक्षित असून ते  तंत्रज्ञानाची माहिती बाळगणारे असल्याची माहिती समोर आली आहे.

भोपाळ : जिलेटीन कांड्याच्या स्फोट घडवून  एटीएममधील पैशावर डल्ला मारणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.  मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे ज्या टोळीला पोलिसांनी अटक केले त्या टोळीचा म्होरक्या हा प्रशासकीय सेवेची तयारी करत असल्याचा माहिती समोर आली आहे. या टोळीतील इतर आरोपी देखील उच्चशिक्षित असून ते  तंत्रज्ञानाची माहिती बाळगणारे असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममधील पैशावर डल्ला मारणाऱ्या आरोपींच्या घरातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत.  

अग्रलेख : आर्थिक सुधारणांचे मैदान

दामोहचे पोलिस अधीक्षक हेमंत चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील मास्टर माइंड 28 वर्षीय देवेंद्र पटेल आणि त्याच्या 5 सहकाऱ्यांना शनिवारी अटक करण्यात आली. ही मंडळी जिलेटीन कांड्याचा वापर करुन स्फोट घडवून आणत एटीएमवर डल्ला मारायचे. देवेंद्र  हा आयएएसची तयारी करत होता. मागील वर्षीच्या जूनपासून ही टोळी सक्रीय होती.    

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

हेमत चौहान पुढे म्हणाले की,  आरोपीने मागील वर्षातील जूनमध्ये टोळी तयार केली. डेटोनेटरच्या माध्यमातून त्यांनी एटीएम लुटण्यास सुरुवात केली. या महिन्यातील 19 तारखेला या टोळीने पन्ना जिल्ह्यातील सिमरिया येथील एटीएममध्ये स्फोट घडवून आणत 23 लाख रुपए चोरले होते. देवेंद्रने एटीएम लुटण्याचे पद्धती या इंटरनेटवरुन शिकला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास असणारे मंडळी दुचाकीवरुन एटीएम शोधायचे. त्यातील दोघे एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवायचे. त्यानंतर कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारायचे. दोघे जण डेटोनेटरला बाइकच्या बॅटरीशी कनेक्ट करायचे आणि आणखी दोघांची जोडी एटीममधून पैसे काढायचे. केवळ 14 मिनिटांत चोरी करुन ते पसार व्हायचे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.एटीएममध्ये चोरी करताना त्यांनी संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा स्प्रेच्या माध्यमातून बंद केला असला तरी त्या एटीएम शेजारील दुकानातील कॅमेऱ्यात ही मंडळी कैद झाली. आणि ते पकडले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS aspirant gang used explosives to ATM Theft in Madhya Pradesh