पोराच्या जिद्दीला पाहून IAS म्हणाले; "हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहिये"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. 

नवी दिल्ली : शहरातील लहान मुले सध्या ऑनलाईन शिक्षणात रमली आहेत पण ग्रामीण भागातील मुले मात्र ऑफलाईन शिक्षण पद्धतीचाच वापर करत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे  ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणसाठी लागणाऱ्या सुविधा व शिक्षक नसूनही घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून 'सेल्फ स्टडी' करणारी लहान मुले ग्रामीण भागात सर्रास पहायला मिळतील. अश्याच एका लहान मुलाचा फोटो IAS अधिकारी अवनीश शरण ह्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी रविवारी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये एक लहान मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्य़ास करत आहे आणि त्याबरोबरच भाजीपाला देखील विकत आहे. एकीकडे घरातली जबाबदारी तर दुसरीकडे शिक्षण असे दृश्य या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोमधील मुलाचे नाव पुष्पेद्र शाहू असे असून तो आता इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे. IAS अवनीश शरण यांनी हा फोटो शेअर करताना दिलेले कॅप्शन देखील स्फुर्तीदायक आहे. "हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहिये" हे त्यांनी दिलेले कॅप्शन अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

हेही वाचा -  'गाड़ दूंगा, टांग दूंगा, लटका दूंगा...'; कमलनाथांचा शिवराज सरकारवर हल्लाबोल

अवनीश यांच्या या पोस्टला 27 हजाराहून अधिक लाइक मिळाले आहेत तसेच या फोटोला पाहून अनेक जणांनी रिट्विट केले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधांची कमतरता आणि आर्थिक दुर्बल असणाऱ्या मुलांची काम करून अभ्यास करण्याची धडपड या फोटोमधून अगदी यथार्थपणे व्यक्त होताना दिसत आहे. या मुलाची  जिद्द पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. तसेच परिस्थिती कशीही असली तरीही माणसाला आपल्या कर्तृत्वाने आकाश गाठता येते, हा संदेश यातून दिसून येतोय. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS Officer Awanish Sharan Twitted an inspirational photo ho kahi bhi aag