IAS Success Story:ऐकायला येत नाही, 102 ताप असतानाही पहिल्या प्रयत्नात आयएएस

IAS Success Story marathi officer saumya sharma hearing problems
IAS Success Story marathi officer saumya sharma hearing problems

IAS Success Story नवी दिल्ली : एखादं दुखणं आयुष्यात आलं, तर त्यालाच कवटाळून बसणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात. पण, त्या दुखण्यावर मात करून, गगन भरारी घेणारे फार कमी असतात. अशा व्यक्तींच्या यादीत मात्र आयएएस अधिकारी सौम्या शर्मा यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल. आपल्या विकलांग असण्यावर त्यांनी मात करून यूपीएससीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करून दाखवलीय. 2017मध्ये त्यांनी हे यश मिळवलं असलं तरी ते अनेकांना कायमस्वरूपी प्रेरणा देणारं आहे. 

सौम्या शर्मा यांना ऐकायला कमी येतं. पण, तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला होता. सुरुवातीला त्यांची ऐकण्याची शक्ती नीट होती. पण, हळू हळू ती कमकुवत झाली. सोळव्या वर्षी त्यांना खूप कमी ऐकायला येऊ लागलं. त्यामुळं त्यांना पूर्णपणे श्रवण यंत्रावर अवलंबून रहावं लागतंय. त्यानंतरही त्यांनी आएएस ऑफिसर होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यासाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. वयाच्या 23व्या वर्षी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्यात पासही झाल्या.

यूपीएससीची परीक्षा पास होणं हे इतर परीक्षासारखेच होते. प्रत्येक परीक्षेप्रमाणं इथं तुम्हाला नियोजन आणि योग्य रणनितीनं अभ्यास करावा लागेल. तर तुम्ही यूपीएससी परीक्षा सहज पास करू शकता. 
- सौम्या शर्मा, आयएएस अधिकारी

तापात दिली परीक्षा
सौम्या शर्मा यांनी 2017मध्येच एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्या दरम्यानच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्याचवर्षी त्यांनी यूपीएससीची प्रिलिम आणि मेन्स दिली होती. ऐकायला कमी येत असल्यामुळं सौम्या यांना विकलांग कोट्यात समाविष्ट करण्यात आले. परंतु, त्यांनी त्या कोट्यातून परीक्षा देण्यास नकार दिला. त्यांनी खुल्या कोट्यातूनच आपल्याला परीक्षा द्यायची असल्याचे सांगितले. शाळेत असल्यापासूनच सौम्या शर्मा अतिशय हूशार होत्या. त्यामुळं त्यांच्यासाठी यूपीएससीची परीक्षा पास होणं काही कठीण नव्हतं. विशेष म्हणजे, प्रलिमच्या दिवशी त्यांना 102 ताप होता. पण, त्या तापातही त्यांनी परीक्षा दिली आणि त्या पासही झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com