तिने 'शर्यत' जिंकली; त्याने तिचे हृदयच जिंकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- देशातील अत्यंत अवघड अशा परीक्षेत तथा बौद्धिक शर्यतीत तिने त्याच्यावर मात करीत देशात अव्वल क्रमांक पटकावला. मात्र, आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या परीक्षेनंतर 'त्याने' तिच्या हृदयावर विजय मिळवत तिला आयुष्यभरासाठी आपलेसे केले... 

नवी दिल्ली- देशातील अत्यंत अवघड अशा परीक्षेत तथा बौद्धिक शर्यतीत तिने त्याच्यावर मात करीत देशात अव्वल क्रमांक पटकावला. मात्र, आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या परीक्षेनंतर 'त्याने' तिच्या हृदयावर विजय मिळवत तिला आयुष्यभरासाठी आपलेसे केले... 

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या परीक्षेत देशात प्रथम आलेली टीना दाबी आणि अतहर आमीर-उल-शफी खान यांची ही कहानी आहे. टीना दाबी ही मागासवर्गीय समाजातील आहे, तर अतहर काश्मिरी मुस्लिम आहे. अतहर हा काश्मीरमधील छोट्या गावातून आलेला आहे. टीना लहानपणापासून राजधानी दिल्लीत राहते. 'अतहर फारच चांगला माणूस आहे. अतहरच्या चिकाटीसाठी त्याचे नेहमीच आभार मानते, असे तिने सांगितले.

नॉर्थ ब्लॉकमध्ये कार्यालयीन कामकाज व प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयात 11 मे रोजी टीना आणि अतहर यांची पहिली भेट झाली. येथे पहिल्याच नजरेत प्रेम झालं आणि खास सरकारी वातावरणात त्यांचे प्रेम फुलले. 

लग्नाच्या बेडीत अडकण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, मात्र लवकरच साखरपुडा करणार असल्याचे टीनाने माध्यमांशी बोलताना सांगितले. दोघांनी आपल्यातील प्रेम दर्शविणारी छायाचित्रे सोशल मीडियावरही शेअर केली. त्यावर काही लोकांनी टीनावर जातीयवादी टिप्पणी करीत धार्मिक शंका उपस्थित केल्या. मात्र "प्यार किया है, कोई चोरी नही की" अशी भूमिका घेत टीनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तर काहींनी या दोघांचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगत स्वागत केले. 

UPSC मध्ये देशात दुसरा आल्यानंतर अतहर खान याने आपल्या पुणे भेटीत 'सकाळ' कार्यालयाला आवर्जून भेट देऊन संवाद साधला होता. त्यापूर्वी शिकत असताना बारामतीमध्ये एका राष्ट्रीय परिषदेसाठी आलो होतो अशी आठवण त्याने सांगितली.

Web Title: ias toppers tina dabi and athar khan to get married