'त्या' घरावर पडलेला बर्फाचा तुकडा आला तरी कुठून ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधल्या शिकारपूर  पोलिसांच्या हद्दीत एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. आकाशातून एक मोठा बर्फाचा तुकडा पडल्यामुळे इथले नागरिक चांगलेच हैराण झालेत. त्याचं झालं असं, शिकारपूरमधल्या चिखल गावातल्या शिव कुमार सिंह नावाच्या व्यक्तीच्या घरावर अचानक बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. हा तुकडा एवढ्या जोरात आदळला, ज्यामुळे त्या घराचं छप्पर तुटलंय

दरम्यान, सदर घटनेनंतर इथल्या लोकांच्या मनात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. अशात घाई गडबडीत लोकांनी पोलीस स्टेशन गाठलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या बर्फाच्या तुकड्याला स्वतःच्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे.       

हा बर्फाचा तुकडा जेंव्हा पडला तेंव्हा घरात कोणीही नव्हतं, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र हा बर्फाचा तुकडा पडल्यानंतर आसपासच्या परिसरात आता भीतीचं वातावरण आहे. हा बर्फाचा तुकडा पाहण्यासाठी आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केली होती.   

दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस देखील सदर घटनेमुळे अवाक झालेत. पोलिसांनी बर्फाचा तुकडा ताब्यात घेऊन आता पोलिस अधिक तपास करतायत. 

आता ही घटना पाहता हा देवाचा चमत्कारच असल्याचं इथले नागरिक म्हणतायत. मात्र, आकाशातून बर्फ पडून घराचं छप्पर आणि थेट घरातील जमिनीकचं देखील नुकसान झालंय. त्यामुळे हा विषय इथल्या लोकांच्या चर्चेचा विषय बनलाय.

Webtitle : ice slab fell on the house breaks the ceiling of the house

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ice slab fell on the house breaks the ceiling of the house