चंदा कोचर यांची होणार चौकशी : आयसीआयसीआय बँक

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

चंदा कोचर यांनी नूपॉवर कंपनी आणि व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये बँकेने 3250 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर नूपॉवरचे अध्यक्ष असून, त्यांच्या नूपॉवर या कंपनीत व्हिडिओकॉन समूहाची 64 कोटींची गुंतवणूक आहे.

नवी दिल्ली : 'आयसीआयसीआय' बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार आहे, असे आयसीआयसीआय बँकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार असून, या समितीचे अध्यक्ष कोण असतील याचा निर्णय ऑडिट कमिटी घेणार आहे. 

चंदा कोचर यांनी नूपॉवर कंपनी आणि व्हिडिओकॉन समूहाला 2012 मध्ये बँकेने 3250 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर नूपॉवरचे अध्यक्ष असून, त्यांच्या नूपॉवर या कंपनीत व्हिडिओकॉन समूहाची 64 कोटींची गुंतवणूक आहे. दीपक कोचर यांच्याशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर होत आहे. त्यानंतर आता याप्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास सुरु करण्यात आला असून, 'सेबी'नेही यापूर्वी कोचर यांना नोटीस बजावली होती. या सर्व प्रकारामुळे चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: ICICI Bank CEO Chanda Kochhars will do inquiry