ICSE 10वी आणि ISC 12वीचा निकाल उद्या; कसा पाहाल निकाल?

ICSE 10th and ISC 12th results tomorrow
ICSE 10th and ISC 12th results tomorrow

नवी दिल्ली- सीआयएससीई बोर्ड आयसीएसईचा 10वीचा आणि आयसीएसई (ICSE) 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी दुपारी 3 वाजता जाहीर होईल. काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन (CISCE) ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर 10 वी आणि 12 वीचा निकाल उद्या लागणार असल्याचं सांगितलं आहे. 10 जूलै म्हणजे शुक्रवारी दुपारी 3 वाजता निकाल प्रदर्शित होईल.  आयसीएसई बोर्ड 10 वी आणि आयसीएसई 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाईन शिक्षण थांबले गावाच्या वेशीवर, नेटवर्कचा थांगपत्ता लागेना: अँड्राईड...
याशिवाय विद्यार्थी एसएमएसच्या (एसएमएस) माध्यमातूनही निकाल पाहू शकणार आहेत. सीआयएससीईच्या संबंधित शाळांच्या प्राध्यापकांनी लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने करिअर  पोर्टलवर विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.

निकाल परिषदेची अधिकृत वेबसाईट cisce.org किंवा result.cisce.org वर लॉगइन करुन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील. शिवाय विद्यार्थ्यांना जर एसएमएसद्वारे निकाल जाणून घ्यायचा असेल तर त्यांना आपला यूनिक आयडी 09248083883 या क्रमांकावर ICSE/ISC (unique id) या स्वरुपात पाठवावा लागणार आहे.

सीआयएससीईने सांगितल्यानुसार अंतर्गत मुल्यांकन विद्यार्थ्याची कार्यक्षमता तपासते आणि सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयातील सरासरी सामान्य शैक्षणिक क्षमतेचे आकलन करते. परिषदेने 2015 ते 2019 आणि 2002 बोर्ड परीक्षांच्या निकालांचा विस्तृत अभ्यास केला आहे.  बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या योग्यता तपासण्यासाठी सर्व घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सीआयएससीई बोर्डाने आपली मुल्यांकन योजना आपल्या अधिकृत वेबसाईटवर जारी केली आहे. त्यात विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुण देण्यात आले हे पाहता येईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com