ICSE Result : दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

ICSE Result : दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : 'इंडियन स्कूल सर्टिफिकेट बोर्ड' परीक्षा (ISCE) दहावी आणि बारावीचा निकाल आज (मंगळवार) दुपारी तीन वाजता जाहीर झाला. यामध्ये बारावीचा 96.52 टक्के तर दहावीचा 98.54 टक्के निकाल लागला. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. 

दहावीच्या परीक्षेत मुंबईतील जुही कजारिया 99.60 टक्के मिळाले असून, जुहीला देशात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच मुंबईतील अनुश्री चौधरी आणि फोरम संजनवाला, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळीने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांना 99.40 टक्के गुण मिळाले.

तसेच गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, नागपूरच्या चंदादेवी सराफ शाळेचा श्रीनाथ अगरवाल, जुहूच्या जमनाबाई नर्सी शाळेचा जुगल पटेल तर ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडेला देशात तिसरा क्रमांक मिळाला. या सर्वांना 99.20 टक्के गुण मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com