सुषमा नावाच्या 'वाघीणी'ने प्रेमासाठीही केले होते धाडस!

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

ज्या काळात महिलांना पुरेसे स्वातंत्र्य नव्हते, आपला नवऱ्याकडे नजर वर करून बघायची हिंमत नव्हती अशा काळात सुषमा यांनी प्रेमविवाह केला...

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्या जितक्या करारी होत्या तितकीच आदर्श अशी त्यांची प्रेमकहाणी होती. 

ज्या काळात महिलांना पुरेसे स्वातंत्र्य नव्हते, आपला नवऱ्याकडे नजर वर करून बघायची हिंमत नव्हती अशा काळात सुषमा यांनी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या विरोधाला तोंड देत त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी वकिल स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला.

sushma swaraj

कॉलेजच्या दिवसांत बहरलं प्रेम....

सुषमा व स्वराज कौशल यांची भेट चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये झाली. तिथूनच त्यांचे प्रेम फुलण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रथम सुषमा यांना घरून खूप विरोध झाला. त्यांना आपल्या घरच्यांची समजूत घालावी लागली. बऱ्याच प्रयत्नांनी सुषमा यांनी आपल्या घरच्यांची समजूत काढून विवाहास परवानगी मिळवली आनंदाने विवाहबद्ध झाल्या.

Image result for sushma swaraj kaushal

सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] स्वराज यांना वयाच्या 34 व्या वर्षी अॅडव्हॉकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्हॉकेट जनरल ठरले. तर वयाच्या 37 व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी 1990 ते 1993 या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ideal love story of sushma swaraj and Swaraj Kaushal