पेटीएमचा फ्रीचार्ज खरेदी करण्याचा विचार...

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नवी दिल्ली: मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम' आता जपानी गुंतवणूकदार सॉफ्टबँकेकडून सुमारे 1.2 अब्ज डॉलर ते 1.5 अब्ज डॉलरएवढा निधी मिळविण्याचा विचार करीत आहे. ही फेरी यशस्वी झाल्यास कंपनीचा प्रतिस्पर्धी फ्रीचार्जची खरेदी करण्याचा विचार आहे, अशी उद्योगवर्तुळात चर्चा सुरु आहे. ऑनलाईन बाजारपेठ फ्लिपकार्टने नुकताच अब्जावधीचा निधी उभारल्यानंतर आता इतर युनिकॉर्न्सनादेखील आपले नशीब आजमावू पाहत आहेत.

हा करार यशस्वी झाल्यास पेटीएममधील बहुतांश हिस्सेदारीवर अलिबाबाऐवजी पेटीएमचा अधिकार निर्माण होणार आहे. यामुळे चिनी गुंतवणूकदारांच्या वाढत्या प्रभावाविषयी भारत सरकारला असलेली चिंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, फ्रीचार्जच्या खरेदीनंतर पेटीएमचे बाजारपेठेत वर्चस्व निर्माण होईल आणि डिजिटल वॉलेट क्षेत्रात मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे. या गुंतवणूक फेरीनंतर पेटीएमचे बाजारमूल्य सात अब्ज डॉलर ते नऊ अब्ज डॉलरएवढे होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, फ्रीचार्जची पालक कंपनी स्नॅपडीलची फ्लिपकार्टला विक्री करण्याचा सॉफ्टबँकेचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

याआधी 2014 साली सॉफ्टबँकेची पेटीएममध्ये गुंतवणूकीसाठी चर्चा झाली होती. पण सॉफ्टबँकेने स्नॅपडीलची निवड केली. त्यानंतर 2015 मध्ये पेटीएमने अलिबाबा आणि अँट फायनान्शियलकडून दीड अब्ज डॉलरचा निधी उभा केला होता. तसेच नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक नागरिकांनी कॅशलेससाठी पेटीएमकडे वळण्यास सुरुवात केली होती. या निर्णयाचा कंपनीला मोठा लाभ झाला होता.

Web Title: Ideas for purchasing paytm