काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली

file photo
file photo

श्रीनगर : सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत मंगळवारी मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. सोपोरे येथे झालेल्या चकमकीत तो ठार झाला होता. अबू माझ असे त्याचे नाव असून, तो पाकिस्तानी नागरिक आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून उत्तर काश्‍मीरमध्ये सक्रिय असून, लष्करे तैयबाचा कमांडर आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. त्याच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून तो मूळचा पाकिस्तानी नागरिक असून, लष्करे तैयबाचा उत्तर काश्‍मीरमधील कमांडर असल्याचेही स्पष्ट झाल्याचे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.

बोमाई भागात झालेल्या अन्य एका चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचीही ओळख पटली असून, त्याचे नाव अब्दुल माजीद वीर ऊर्फ समीर असे आहे. या प्रवक्‍त्याने सांगितले, की 2015 पासून माझ याचे गुन्हेगारी स्वरूपाचे रेकॉर्ड असून, तो या भागात गंभीर दहशतवादी कारवायात सक्रिय होता. सोपोरे आणि हंदवारा भागांत तो मुळात दहशतवादी कारवायांबाबत सक्रिय होता. सुरक्षा दलांवरील हल्ल्यात त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्याच्याविरुद्ध पोलिसांत अनेक गुन्हे दाखल होते, असेही त्यांनी सांगितले. 2015 पासून सुरक्षा दल आणि लष्करातील अधिकारी यांच्यावरील हल्ल्यात माझचा मोठा सहभाग होता. त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत एक सुरक्षा दलाचा अधिकारी आणि तीन नागरिक ठार झाले आहेत, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com