जामा मशिदीखाली देवी-देवतांच्या मूर्ती; हिंदू महासभेने पंतप्रधानांना लिहिलेले पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Idols of gods and goddesses under Jama Masjid

जामा मशिदीखाली देवी-देवतांच्या मूर्ती; हिंदू महासभेने पंतप्रधानांना लिहिलेले पत्र

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद, कुतुब मीनार आणि ताजमहालानंतर आता दिल्लीची जामा मशीदही (Jama Masjid) हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आली आहे. जामा मशिदीखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून जामा मशिदीचा चबुतरा आणि पायऱ्या खोदून काढण्याचे आवाहन केले आहे. (Idols of gods and goddesses under Jama Masjid)

स्वामी चक्रपाणी यांनी शाही इमामांकडे जामा मशिदीचे (Jama Masjid) उत्खनन करण्याची परवानगी मागितली. यात जे काही सत्य असेल ते लोकांसमोर येईल, असेही ते म्हणाले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात असताना हिंदू महासभेने ही मागणी केली आहे. मात्र, सध्या हिंदू बाजू आणि मुस्लिम बाजू वेगवेगळे दावे करीत आहेत.

हेही वाचा: कुतुब मीनार म्हणजे सन टॉवर; राजा विक्रमादित्यांनी बांधल्याचा दावा

स्वामी चक्रपाणी यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी दिल्लीचे (Delhi) नाव बदलून इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली होती. कारण, या नावाला खूप महत्त्व आहे. दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ केले तर दिल्लीत पाऊस पडेल आणि दिल्लीत समृद्धी येईल. जेव्हा देशाची राजधानी आनंदी असेल तेव्हा देश आनंदी होईल, असे ते म्हणाले होते.

ज्ञानवापी हे हिंदू मंदिर होते

ज्ञानवापीमध्ये (Gyanvapi) शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर स्वामी चक्रपाणी म्हणाले की, तेथे हिंदू मंदिर असल्याची १०० टक्के पुष्टी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते सील करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तिकडे कोणीही जाऊ देऊ नका.

Web Title: Idols Of Gods And Goddesses Under Jama Masjid Hindu Mahasabha Letter To The Prime Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhi
go to top