शिख दंगलीबाबत मनमोहन सिंग यांचा मोठा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शिख दंगलीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या खुलाशामुळे सध्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शिख दंगलीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या खुलाशामुळे सध्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर

दरम्यान, मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे की, जर तत्कालीन गृहमंत्री पीव्ही नरसिंह राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत झालेली शिख दंगल टाळता आली असती. गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनमोहन सिंग म्हणाले की, ''दिल्लीत ज्यावेळी शिख दंगल उसळली होती तेव्हा इंद्रकुमार गुजराल तेव्हाचे गृहमंत्री नरसिंह राव यांच्याकडे गेले. त्यांनी राव यांनी परिस्थिती गंभीर असून सरकारने लवकर लष्कराला पाचारण करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, तत्कालीन सरकारने गुजराल यांच्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

1984 मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. देशात एकूण 3 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. फक्त दिल्लीतच 2 हजार जणांना प्राण गमवावे लागले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

तसेच दिल्लीतील अनेक भागात लूटीच्या आणि हत्येच्या घटना घडल्या होत्या. दुकाने, घरे आणि गुरुद्वारात लूटमार केल्यानंतर आग लावण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेल्या शिखांच्या वस्ती, झोपडपट्टी आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणांवर हिंसाचार झाला होता. काहींना जिवंत जाळल्याचे प्रकारही घडले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If that advice had been heeded perhaps 84 massacre could have been avoided says former pm manmohan singh