'ते' स्पर्श करणारे हात तोडून टाका: केंद्रीय मंत्री

Anantkumar Hegde
Anantkumar Hegde

बंगळूरूः हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका, तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे.

हेगडे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कोडागूमध्ये रविवारी (ता. 27) झालेल्या सभेदरम्यान बोलताना हेगडे म्हणाले, 'हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका, इतिहास असाच लिहला जातो. तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा.
जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे.'

ताजमहाल मुस्लिमांनी बनवला नाही...
'ताजमहाल मुस्लिमांनी बनवला नाही तर राजा जयसिंह यांच्याकडून शाहजहाँने विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचे निर्माण राजा परमतीर्थ यांनी केले होते. ताजमहालचे पहिले नाव तेजो महालय होते. पुढे त्याचे ताजमहाल असे नामकरण करण्यात आले. आपण जर असेच शांत राहिलो तर भविष्यात भगवान रामाला जहांपनाह आणि देवी सीताला बीबी या नावाने ओळखले जाईल,' असे हेगडे म्हणाले.

दरम्यान, हेगडे यांनी प्रथमच अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही तर यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे म्हणतानाच हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच आहे, असेही हेगडे म्हणाले होते. टीपू सुल्तान यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com