माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यास पाच लाखांचे पॅकेज

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

तिरुअनंतपुरम : जे माओवादी आत्मसमर्पण करू इच्छितात आणि पुन्हा मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात त्या सर्वांसाठी केरळ सरकारने बुधवारी एक घर आणि 5 लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. हा निर्णय मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साप्ताहिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

हे पॅकेज दे्ण्याचे मुख्य कारण हे माओवाद्यांच्या जाळयात अडकलेल्यांना बाहेर काढणे व त्यांच्या संघटनेत जाणाऱ्यांना रोखण्यासाठी आहे, असे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले. पुनर्वसन पॅकेज देण्यापूर्वी सर्व पडताळणी होईल, तसेच खात्रीने निरीक्षण केले जाईल. या पॅकेजद्वारे या लोकांना रोजगार मिळावेत अशी इच्छा विजयन यांनी व्यक्त केली. 

शरण आलेल्या माओवाद्यांच्या स्थितीनुसार हे पॅकेज 'अ', 'ब' आणि 'क' या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. क्रमवारी श्रेणी 'अ' उच्च स्थानी असून त्यात प्रत्येकी 5 लाख रुपये, तर अन्य दोन श्रेणीत प्रत्येकी 3 लाख रुपये हफ्त्यांमध्ये दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना 15,000 रुपये, लग्नासाठी 25 हजार रुपये दिले जाणार आहे. ज्यांना हे पॅकेज हवे आहे, अशांना तीन महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.

यामध्ये 'एके 47' जमा केल्यास त्याच्या बदल्यात 25,000 रूपये तर, अन्य शस्त्रास्त्रे जमा केल्यास त्यापेक्षा कमी रक्कम दिली जाईल. माओवादी या सर्वसामान्य माफीचा उपयोग करून घेतील या आशेने पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: If the Maoists surrender they get package of five lacks