...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत

...तर भाजप धोकादायक पक्ष- रजनीकांत

चेन्नई- विरोधी पक्षांना जर भारतीय जनता पक्ष हा धोकादायक आहे असे वाटत असेल तर, नक्कीच तसे असू शकते असे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले आहे. चेन्नईच्या विमानतळावर एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे.

आगामी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा सामना करण्यासाठी विरोधीपक्षांकडून महाआघाडीचा प्रयत्न सुरु आहे. तसेच, रजनीकांत यांची भाजपशी जवळीक वाढत चालली होती आणि त्यातच त्यांनी असे विधान केल्याने आता रजनीकांत यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नोटाबंदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रजनीकांत यांनी भाजपवर टीका करण्यापासून स्वतःचा बचाव केला. ते म्हणाले, सरकारने देशभरात केलेली नोटाबंदी योग्य नव्हती. मात्र, वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीवर चर्चा करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, रजनीकांत यांच्या राजकीय भविष्याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. मध्यंतरी त्यांची भाजपसोबतही जवळीक वाढल्याने तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर टीका करताना त्यांना भाजपच्या हातातील खेळणे असल्याचे म्हटले होते. रजनीकांत यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत राजकारणात येण्याची घोषणा केली होती. येत्या 12 डिसेंबर रोजी ते आपल्या वाढदिवसादिवशी राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com