'राम मंदिर झालं नाहीतर भाजपवरील विश्वास उडेल'

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

नवी दिल्ली :  जर राम मंदिराची उभारणी केली गेली नाहीतर जनतेचा भाजपवरील विश्वास उडेल, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच लोकांची ओळख रामपासून निगडित आहे, असेही ते म्हणाले.

रामदेवबाबा म्हणाले, जर राम मंदिराची उभारणी केली गेली नाहीतर जनतेचा भाजपवरील विश्वास उडेल. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी आज (रविवार) सांगितले, की आमचा पक्ष अयोध्येतील विवादित जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी आवश्यक अध्यादेशच्या पर्यायाबाबत विचार करत नाही. मात्र, भाजपकडूनच या राम मंदिराची उभारणी केली जाईल.

तसेच ते पुढे म्हणाले, विरोधीपक्षांच्या प्रयत्नामुळे भाजपला नुकसान पोचत आहे. राम मंदिर अयोध्येत बनले नाहीतर मग मक्का मदिनेत बनणार का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने भाजपला यातून मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: If Ram Temple not Construct then people not Trust on BJP says Ramdev Baba