गोव्यात आज निवडणूक झाल्यास काँग्रेसला 25 जागा

गोव्यात आज निवडणूक झाल्यास काँग्रेसला 25 जागा

मडगाव : गोव्यात आज विधानसभा निवडणूक झाल्यास काँग्रेसला 40 पैकी 25 जागा मिळणार असून भाजपला पाच देखील जागा मिळणार नाहीत, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे केले.

भाजपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरु असून जनमत भाजपच्या विरोधात असल्याने या स्थितीत निवडणूक झाल्यास जनता काँग्रेसला बहुमत देईल, असा विश्वास चोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, माजी अध्यक्ष सुभाष फळदेसाई, काँग्रेसच्या माहिती हक्क विभागाचे अध्यक्ष ग्लेनवील डायस व पराग रायकर उपस्थित होते. 

भाजप गोव्यात मध्यावधी निवडणूक घेण्याची शक्यता काँग्रेसने आधीच वर्तवली होती. भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनीही गोव्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करून काँग्रेसच्या दाव्यास पुष्टी दिली आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

काँग्रेस मध्यावधी निवडणुकीच्या तत्वतः विरोधात आहे. गोव्याच्या जनतेने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजुने कौल दिला होता. भाजपने केंद्रात असलेल्या सत्तेचा फायदा घेऊन मागील दाराने गोव्यात सत्ता हस्तगत केली. मध्यावधी निवडणूक लादल्यास जनतेच्या पैशांचा तो अपव्यय ठरणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीस काँग्रेसचा विरोध आहे. पण, मध्यावधी निवडणूक झाल्यास मात्र काँग्रेस त्यासाठी सज्ज आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

लोबो हे भाजपचे आमदार असले तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅडरमधील नाहीत. त्यामुळे ते स्पष्ट व खरे ते बोलतात. भाजपचे आजी माजी आमदार नेते उघडपणे पक्षाच्या विरोधात बोलत असल्याने भाजपमध्ये फूट पडणार असल्याचे काँग्रेसने केलेले भाकीत सत्यात उतरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com