लोक कपडे खरेदी करतात म्हणजे मंदी नाही; 'या' खासदाराचा अजब दावा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

  • भाजप खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांचा अजब दावा

बलिया : देशात खरोखरच आर्थिक मंदी असती, तर आपण कपडेच खरेदी करू शकलो नसतो, असे सांगत भारतात आर्थिक मंदी नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बलियाचे खासदार वीरेंद्रसिंह एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, या कार्यक्रमाला आलेल्यांनी शर्ट आणि पँट घातली आहे. देशात आर्थिक मंदी असती, तर आपल्याला शर्ट-पँटऐवजी धोतर आणि कुर्ता घालून यावे लागले असते. जगाला आर्थिक मंदीचा विळखा बसलेला असू शकतो. मात्र, त्याचा भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण, भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, ती मुख्यत्वे ग्रामीण आणि कृषीवर आधारित आहे. आर्थिक मंदी असती तर आपल्याला शर्ट, पायजमाही खरेदी करता आला नसता.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

भारत देश हा फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकता अशा महानगरांनीच बनलेला नाही; तर त्यात ६.५ लाख खेडी आणि गावे आहेत. बॅंकांमध्ये गावातील लोकांचाच पैसा अधिक आहे, असे बॅंकांच्या अहवालात म्हटले आहे. खेड्यातील लोकांनी त्याग, बलिदान दिले नसते तर भारताला मुघल आणि ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालेच नसते, असा दावाही वीरेंद्रसिंह यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If there is a recession people would be wearing dhoti-kurta not pants and coat says BJP MP