...अन्यथा डोक्याला हाथ लावण्याची वेळ येईल: भाजप नेता

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

जयपूर: हिंदू जर एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील अनेक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. देशात लव्ह जिहाद वाढत असून, लवकर बदला अन्यथा डोक्याला हाथ लावण्याची वेळ येईल, असे भारतीय जनता पक्षाचे उदयपूरमधील आमदार व माजी गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी म्हटले आहे. कटारिया यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उदयपूर येथील एका गावामध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना कटारिया म्हणाले, देशामध्ये लव्ह जिहादचे प्रमाण वाढत चालले आहे. योग्य वेळी आपण जागे झालो नाही तर अवघड होईल. लवकर बदला अन्यथा डोक्याला हाथ लावण्याची वेळ येईल व आयुष्यभर रडत बसावे लागले. हिंदू एकवटले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. संधी मिळाल्यास जुन्या जयपूरला भेट द्या. या परिसरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत, कारण येथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजांचे येथे पालन होऊ शकत नाही, कारण येथील लोक मंदिर परिसरात मांस-हाडे फेकतात. या लोकांसोबत प्रत्येक दिवशी कोण वाद घालत बसेल?'

'नागरिकांना आता कुटुंब आणि तरुण मुलींचा बचाव करण्यासाठी घर सोडून जावे लागत आहे. तुम्हाला माहितीय लव्ह जिहाद काय आहे? तुमच्या मुली पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत. धोका लक्षात घेऊन हिदूंनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्र यायला हवे. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत, जाती आणि धर्म विसरुन जा. रामच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही 'राम-राम' म्हणतो. एकमेकांना भेटतो तेव्हाही 'राम-राम' याच शब्दाचा उपयोग करतो', असेही कटारिया म्हणाले.

दरम्यान, भाजपमधील अनेक नेते वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करत असून, या यादीमध्ये कटारिया यांचाही समावेश झाला आहे.

Web Title: if things dont change may have pakistan every city rajasthan says bjp mla