रेल्वे रद्द झाली तर पूर्ण परतावा मिळणार

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

नवी दिल्ली : तुम्ही प्रवास करणार असलेली रेल्वेगाडी पूर्णपणे रद्द झाली, तर तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे आता तुमच्या बॅंक खात्यात आपोआप वळते होणार आहेत. रेल्वेने ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सुविधा लागू केली आहे. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर असंख्य तांत्रिक अडचणी येतात त्यावरही मार्ग शोधण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : तुम्ही प्रवास करणार असलेली रेल्वेगाडी पूर्णपणे रद्द झाली, तर तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे आता तुमच्या बॅंक खात्यात आपोआप वळते होणार आहेत. रेल्वेने ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सुविधा लागू केली आहे. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर असंख्य तांत्रिक अडचणी येतात त्यावरही मार्ग शोधण्यात येणार आहे.

"डिजिटल इंडिया'च्या जमान्यात रेल्वे मात्र अनेक मैल मागे असल्याची प्रचिती अनेकदा येते. खुद्द दिल्लीत संसदेपासून हाकेच्या अंतरावरही तिकीट आरक्षणासाठी पेटीएम किंवा डेबीट कार्ड यंत्राऐवजी रोख रक्कम देण्याचा आग्रह संबंधित कर्मचारी धरतात, असा अनुभव आहे. तिकीट रद्द केले तर बॅंक खात्यांत पैसे वळते होण्यासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागते, असेही अनुभव आहेत. आयआरसीटीसीने या तांत्रिक अडचणींवर मार्ग काढण्याचे ठरविले असून, नुकतीच संकेतस्थळही अपडेट करण्यात आले आहे. त्यासाठी मागील आठवड्यात एक रात्रभर आरक्षण सुविधा बंद ठेवण्यात आली होती. आता रद्द झालेल्या गाड्यांसाठी तिकिटाचा पूर्ण परतावा मिळण्याची योजना रेल्वेने आणली आहे. गाडी निर्धारित वेळेच्या तीन तासांपर्यंत सुरवातीच्या स्थानकावरून सुटलीच नाही व ती पहिल्या ते अखेरच्या स्थानकापर्यंत रद्द करण्यात आली, तरी कन्फर्म तिकीट धारकांना त्यांचे पैसे परत मिळतील. त्यांचा पीएनआर क्रमांक स्वयंचलित प्रक्रियेने आपोआप रद्द होईल व तिकिटाची रक्कम खात्यात वळती होईल किंवा प्रवाशांना परताव्यासाठी ऑनलाइन दावा करता येईल.

तिकीट हस्तांतर करता येणार
वातानुकूलित डब्यातील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होताना ते स्लीपर वर्गाचे मिळाले व त्यातून ते प्रवास करू इच्छित नसतील तरीही त्यांना तिकीट रकमेचा परतावा मिळेल, असेही रेल्वेने जाहीर केले आहे. गाडीचा मार्ग बदलला व त्यावर ज्यांचे स्थानक नसेल त्या प्रवाशांनाही तिकीट रक्कम परत मिळेल. एखादा प्रवासी काही कारणाने प्रवास करू शकत नसेल, तर त्याला आपले तिकीट दुसऱ्या प्रवाशाला हस्तांतर करण्याचीही सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: If the train is canceled the full refund will be received