सत्ता मिळाल्यास प्रत्येक राज्यात कर्जमाफी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

जयपूर - लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला, तर आम्ही प्रत्येक राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांवरील भार हलका करायचा असेल, तर केवळ कर्जमाफी पुरेशी नाही. आता नव्या हरितक्रांतीची गरज आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली असल्याचा घणाघात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. ते येथे आयोजित विजय रॅलीमध्ये बोलत होते. 

राहुल म्हणाले, ""आम्ही दाखवून दिले की मोदी जे काम साडेचार वर्षांमध्ये करू शकले नाहीत ते आम्ही दोन दिवसांमध्ये करून दाखविले. आता शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवे धोरण आखावे लागेल. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला मोठ्या महानगरांशी जोडू पाहत आहोत. आमचे सरकार राजस्थानात कोल्ड चेन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू पाहत आहे. देशातील तरुण आणि शेतकऱ्यांनी आता बॅकफूटवर न राहता पुढे जाऊन खेळत षटकार खेचायला हवेत. देशातील तरुणांनी आता कुणालाही घाबरता कामा नये, मोदी पाच वर्षे केवळ आश्‍वासनेच देत होते, आम्ही दोनच दिवसांमध्ये ती पूर्ण केली.'' 

राफेलवरूनही टीका 
राफेल व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, हे प्रकरण संयुक्त संसदीय समितीकडे दिले जावे, असेही आमचे मत आहे. पंतप्रधान मोदी 56 इंचाची छाती असल्याचा दावा करतात, पण एक मिनिटासाठीही ते लोकसभेत फिरकलेदेखील नाहीत. संरक्षणमंत्र्यांनी सव्वादोन तास भाषण दिले. पण, आमच्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, असेही राहुल यांनी नमूद केले. 

राहुल म्हणाले... 
- आमची दारे शेतकऱ्यांसाठी नेहमी खुली 
- कॉंग्रेस पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही 
- शेतीला अर्थव्यवस्थेशी जोडावे लागेल 
- कॉंग्रेस जिंकली, पण मालक मात्र जनताच 
- प्रत्यक्ष बॅटिंग करताना मोदी घाबरतात

Web Title: if we got a chance will give Loan waiver to farmers in every state rahul gandhi