दारू प्यायल्यास तर घालावे लागेल गावजेवण

दारू प्यायल्यास तर घालावे लागेल गावजेवण

गांधीनगर : देशभर दारुबंदीकरीता सरकारकडून आणि स्थानिकांकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. मात्र गुजरातमधील एका गावात दारु पियाल्यास एक अजब प्रकारची शिक्षा सुनावल्यामुळे हे गाव चर्चेत आले आहे. 

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील खाटीसितारा गावात कोणी दारु पिताना दिसल्यास त्याला संपुर्ण गावाला मटण पार्टी द्यावी लागणार आहे. यासोबतच दोन हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. बनासकांठा जिल्ह्यातील खाटीसितारा गावात बहुसंख्य नागरिक आदिवासी आहेत. सध्या या गावात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने   हिंसा आणि हत्येच्या घटनांमध्ये ही वाढ झाली असून अनेकांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आहेत. 

त्यामुळे दारूच्या व्यसनातून सुटका करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून यासाठी हा नवीन नियम करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे गावात कोणी दारू पिताना दिसल्यास त्याच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असून याशिवाय त्याला सर्व गावाला मटण पार्टी द्यावी लागणार आहे.
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com