"दारू प्यायची असेल तर..."; लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाचा अजब निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination
दारू प्यायची असेल तर लसीचे दोन्ही डोस घेणं बंधणकारक; प्रशासनाचा अजब निर्णय

MP: दारू प्यायची असेल तर लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लसीकरण मोहिमेमुळे मोठे यश आल्याचे पाहायला मिळते आहे. लसीकरणामुळेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी झाला असून, रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं यासाठी सरकारकडून वेगवेळ्या पद्धतीने जागृकता निर्माण केली जाते आहे. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात लोकांनी लसीकरण करावं यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली गेल्याचं पाहायला मिळतं आहे.

हेही वाचा: कोर कंमाडर स्तरावरील बैठकीसाठी चीन तयार

खंडवा जिल्ह्यातील लोकांनी लसीकरण करावं यासाठी खंडवा जिल्हा प्रशासनाने एक अजब निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या लोकांनी कोविड-19 विरुद्ध लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच दारू मिळणार आहे. सध्या या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सूरू आहे. जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या सुचना दिल्या असून, तसं पत्र देखील समोर आलं आहे.

हेही वाचा: ऑईल अँड गॅस सेक्टरमधील 'हे' 3 शेअर्स देतील भरघोस परतावा

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अमलबजावणी करताना कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसून, फक्त तोंडी मद्यपींना आश्वासन द्यावे लागणार आहे. "कोणत्याही लसीकरणाच्या पुराव्याची गरज नाही... पूर्ण लसीकरण झाल्याचे केवळ तोंडी आश्वासन पुरेसे आहे... जे मद्यपान करतात ते खोटे बोलत नाहीत..." असं जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणाले.

loading image
go to top