आयआयटी खड्‌गपूर भविष्याचा वेध घेणार

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

कोलकता - शाश्‍वत अन्न सुरक्षा, भविष्यातील शहरे, जीव विज्ञान आणि ऐतिहासिक वारसा या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरविलेल्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर आयआयटी खड्‌गपूरने काम सुरू केले आहे.

आयआयटी खड्‌गपूरचे संचालक श्रीमान कुमार भट्टाचार्य म्हणाले, ""देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्त्वपूर्ण असलेल्या चार प्रकल्पांवर आम्ही काम सुरू केले आहे. यात शाश्‍वत अन्न सुरक्षा, भविष्यातील शहरे, जीव विज्ञानातील यंत्रणा आणि ऐतिहासिक वारशासाठी विज्ञानाचा वापर, असे चार प्रकल्प आहेत. यासोबत सहा एकात्मिक प्रकल्पांवरही काम करण्यात येत आहे. यात नावीन्यपूर्ण पायाभूत सुविधा, डिजिटल एकत्रीकरण, वाहतूक तंत्रज्ञान, परवडण्याजोग्या आरोग्य सुविधा, अत्याधुनिक उत्पादन सुविधा आणि भविष्यातील पृथ्वीचे भूविज्ञान असे हे सहा प्रकल्प आहेत. सध्या संस्थेत तीनशेपेक्षा अधिक संशोधने सुरू आहेत.''

Web Title: iit kharadpur technology marathi news sakal news kolkata news

टॅग्स