स्क्रिनवरील वस्तू स्पर्शाने अनुभवता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iit

स्क्रिनवरील वस्तू स्पर्शाने अनुभवता येणार

नवी दिल्ली : ऑनलाइन खरेदी करताना आपल्या सध्याच्या टचस्क्रिन उपकरणांवर आपण उत्पादने किंवा वस्तू वेगवेगळ्या कोनातून पाहू शकतो. पण भारतीय औद्योगिक संस्था, मद्रास (आयआयटी)च्या विद्यार्थ्यांनी एक विशेष डिस्प्ले (पडदा) तयार केला आहे. या डिस्प्लेवर वस्तूंची छायाचित्रे पाहिला मिळतीलच, शिवाय स्पर्श आणि अनुभवताही येणार आहे.

आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी विकसित केलेल्या या नव्या डिस्प्लेला ‘आय टॅड’ (इंटरॲक्टिव्ह टच ॲटिव्ह डिस्प्ले) असे नाव दिले आहे. या डिस्‍प्लेवर ऑनलाइन खरेदी करताना उत्पादनांना स्पर्श करून त्यांचा पोत, घडण आदींचा अनुभव घेता येऊ शकतो. असा डिस्प्ले असलेल्या उपकरणांमध्ये बहुस्पर्शीय सेन्सर बसविण्यात आले आहेत. डिस्प्लेवर फिरत्या भागांचा वापर केलेला नाही. पण सेन्सरद्वारे आपल्या बोटांची हालचाल आणि पृष्ठभागाचे घर्षण याची याचा अनुभव जाणवतो. यातील विद्युत क्षेत्रे ‘इलेक्ट्रोएडेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भौतिक घटनेद्वारे नियंत्रित केली जातात.

या आधुनिक पिढीतील डिस्प्लेमधून यूजरने स्क्रिनवर टच केल्यानंतर वेगळा अनुभव मिळेल. स्क्रिनवर दिसणाऱ्या वस्तूला स्पर्श केल्याचा उदा. खरखरीत पृष्ठभाग, टोकदार कडा असा अनुभव मिळतो. पण या स्क्रिनवर कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना स्पर्श करून अनुभव घेता येईल, त्याची प्रमाण किती असेल, याची माहिती देण्यात आलेली नाही. संगणकाशी होणारा संवाद अनुभवण्याची महत्त्वाची गोष्ट यात असल्याने ‘आय टॅड’ हा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, असा दावा ‘आयआयटी- मद्रास’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे.

खरेदीचा उच्च दर्जाचा अनुभव

संस्थेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स’चे प्रा.एम. मणीवन्नन यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले आहे. ते म्हणाले, की हा ‘आय टॅड’चा काळ आहे. या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन खरेदीचा एकदम वेगळा आणि उच्च दर्जाचा अनुभव मिळणार आहे. ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी आपण वस्तूंना स्पर्श करू शकतो. उत्पादनांचा अनुभवता येतात. ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तू प्रत्यक्षात वेगळ्या असल्याने त्या परत करण्याचे प्रमाण ३० टक्के आहे.

टॅग्स :IITCollege