नोटाबंदीनंतर 4,708 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

प्राप्तिकर विभागाने 8 नोव्हेंबरला नोटांबदी झाल्यानंतर देशभरात एकूण 1 हजार 138 छापे टाकले. कर चुकवेगिरी आणि हवाला व्यवहारप्रकरणी 5 हजार 184 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या छाप्यात 609.39 कोटी रुपयांची रोकड व दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने काळ्या पैशाविरोधात देशभरात केलेल्या कारवाईत 4 हजार 807 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. तसेच, 112 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने 8 नोव्हेंबरला नोटांबदी झाल्यानंतर देशभरात एकूण 1 हजार 138 छापे टाकले. कर चुकवेगिरी आणि हवाला व्यवहारप्रकरणी 5 हजार 184 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या छाप्यात 609.39 कोटी रुपयांची रोकड व दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच, 112.8 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जमा केल्या असून, यात प्रामुख्याने दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर देशभरात झालेल्या कारवाईत 5 जानेवारीपर्यंत 4 हजार 807.45 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे.

प्राप्तिकर विभागाने 526 प्रकरणे तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) पाठविली आहेत. यात कर चुकवेगिरी, बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा समावेश आहे.

Web Title: illegal property worth of crores unveiled