भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकला: निखिल सवानी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

भाजपने पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांना भाजपमध्ये येण्यासाठी एक कोटींची ऑफर दिल्याची ऐकल्यानंतर मी निराश झालो. त्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र पटेल यांचे मी आभार मानतो. ते छोट्या कुटुंबातील असूनही ते एक कोटींच्या अमिषाला बळी पडले नाहीत.

अहमदाबाद - भाजपकडून गुजरातमध्ये घोडेबाजार सुरु आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय चुकला, असे म्हणत पाटीदार नेते निखिल सवानी यांनी आज (सोमवार) भाजपला रामराम केला.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतेच भाजपमध्ये सहभागी झालेले निखिल सवानी यांनी आज भाजप सोडून पुन्हा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा झटका समजण्यात येत आहे. सवानी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

निखिल सवानी म्हणाले, की पाटीदार समाजाच्या हितासाठी मी भाजपमध्ये सहभागी झालो होतो. माझे हार्दिक पटेलसोबत मतभेद आहेत, मनभेद नाही. भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी मला पैसे देऊ केले नव्हते. पण, नुसतीच आश्वासने दिली होती. ती एकही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. राहुल गांधी यांना भेटण्याची वेळ मागितली असून, त्यानंतर मी पुढील निर्णय घेतला आहे. भाजपने पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांना भाजपमध्ये येण्यासाठी एक कोटींची ऑफर दिल्याची ऐकल्यानंतर मी निराश झालो. त्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र पटेल यांचे मी आभार मानतो. ते छोट्या कुटुंबातील असूनही ते एक कोटींच्या अमिषाला बळी पडले नाहीत.

Web Title: I'm upset. Leaving BJP today: Nikhil Sawani, Patidar leader