दिल्लीसह 'या' राज्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस, अलर्ट जारी

Delhi Rain Alert
Delhi Rain Alertsakal

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये मुसळधार पावसाने (IMD Rain Alert) हजेरी लावली आहे. त्यातच आज उत्तराखंड, पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

Delhi Rain Alert
उस्मानाबाद : एका दिवसात ७५ मिलिमीटर अवकाळी पाऊस

सध्या देशात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागात पाऊस झाला. त्यानंतर हा पाऊस आता उत्तरेकडे सरकला असून दिल्लीसह हरियाणामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे देखील रस्त्यावर पडली आहेत. पण, या पावसामुळे ४८ डिग्री तापमानात राहणाऱ्या दिल्लीकरांना मात्र उकाड्यापासून चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे गुरुग्राममधील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आठ दिवसांत तापमान कमी होणार असून ढगाळ वातावरण कायम राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, आसामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून पुराने थैमान घातले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. शेकडो गावातील लोकांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com