सुरक्षा दलांनी केली चार दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

इंफाळ : राज्याच्या विविध भागांतून सुरक्षा दलांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात चार दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी आज येथे सांगितले. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रन्ट आणि एक पूर्वी दहशतवादी कारवायात सक्रीय होता. या सर्वांना काल इम्फाळमधून अटक करण्यात आली, असे पोलिस अधिक्षक कबिब यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या यूएनएलएफच्या दहशतवाद्यांकडून बॅरल गन, डिमांड नोट्‌स आणि चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, कांगलेपक कम्युनिस्ट पक्षाच्या एका केडरला पूर्व इम्फाळ जिल्ह्यात लौशंगखोंग येथे पोलिस कमांडो आणि आसाम रायफल्सने संयुक्त कारवाई करीत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: imphal news four terroist arrested