मणिपूरमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

इंफाळ : म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात नक्षलवादी आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार झाले, तर आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पहाटे पाच वाजता ही चकमक झाली. चकपीकरोग पोलिस ठाण्यापासून 18 कि.मी.वरील चमोल गावात नक्षलवादी स्फोटके पेरत असल्याची माहिती आसाम रायफल्सच्या जवानांना मिळाली, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नक्षलवादी आणि सुरक्षा दलात यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले तर आसाम रायफल्सचे दोन जवान जखमी झाले. या चकमकीनंतर आसाम रायफलसच्या जवानांनी घटनास्थळावरून स्फोटके आणि रायफल्स जप्त केल्या, असे या अधिकाऱ्याने सांगितले. दुर्गम भागात अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

सोमवारी मानमनी गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात आसाम रायफल्सचे दोन जवान हुतात्मा झाले होते, तर अन्य सहा जण जखमी झाले होते.

Web Title: imphal news Two Maoists killed in Manipur encounter