इम्रान खान यांच्या शपथविधीला सिद्धू जाणार पाकिस्तानला

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

तसेच क्रिकेट विश्वातील सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह अभिनेता आमिर खानसह अन्य काहींना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : पंजाब कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपट्टू नवज्योत सिंग सिद्धू यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यांचे निमंत्रण सिद्धू यांनी स्वीकारले असून, इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू पाकिस्तानला जाणार आहेत.

इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) पक्षाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असून, पाकिस्तानात 115 जागा मिळवत 'पीटीआय' सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर पीटीआयने सत्तास्थापनेचा दावा केला असून, येत्या 11 ऑगस्टला इम्रान खान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीसाठी इम्रान खान यांच्याकडून भारतातील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे.

तसेच क्रिकेट विश्वातील सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह अभिनेता आमिर खानसह अन्य काहींना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

दरम्यान, या आमंत्रणाबाबत सिद्धू म्हणाले, की ''हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. इम्रान खान यांच्याकडून मला वैयक्तिक आमंत्रण मिळाले आहे. त्यांचे हे आमंत्रण कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीवरून देण्यात आलेले नाही. त्यांचे आमंत्रण मी स्वीकारले आहे''. 

Web Title: Imran Khan can be trusted says Navjot Sidhu after accepting invite for oath ceremony